श्रीच्या प्रकट दिनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते भव्य महाप्रसादाचे वितरण
जय गजानन नाका डोणगाव ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380
संग्रामपूर मेहकर/डोणगाव :- डोणगाव येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील जय गजानन नाका ग्रुपच्या वतीने तब्बल 11 क्विंटल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा डोणगाव पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला.
डोणगाव येथे जय गजानन नाका ग्रुपच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या 147 वा प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता गावातील मुख्य मार्गाने संत गजानन महाराज पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्याचबरोबर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाला प्रारंभ करण्यात आला. भाविकांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित भव्य महाप्रसादाचा डोणगाव शहरातील व पंचक्रोशितील गावातील हजारो भाविकांनी श्री चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष राहटे, तालुकाप्रमुख तथा माजी सभापती निंबाजी पांडव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.