नागपूर महानगरपालिकेचे मदत कार्य

52

नागपूर महानगरपालिकेचे मदत कार्य

तीन म्हैस एक गाय पैकी एक म्हैस व एक गाय सुखरूप जिवंत बाहेर काढण्यात आले यश

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर येथील नारा रोड कोराडी पॉवर प्लांट च्या मागे रेल्वे ट्रॅक जवळ तीन म्हैस व एक गाय गाळनात फसलेली असता त्या परिसरातील जनतेनी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळविले व मदतीसाठी पोहचलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या तीन म्हैस व एका गाय यास बाहेर काढण्यासाठी कार्य सुरु केले आणि अडकलेले तीन म्हैस एक गाय पैकी एक म्हैस व एक गाय सुखरूप जिवंत बाहेर काढण्यात यश आले

तसेच दुसऱ्या घटनेची माहिती कळताच स्वावलंबी नगर येथे जाऊन झाडावर अडकलेला पक्षी सुखरूप काढून त्या पक्षाला सुद्धा जीवदान देण्यात महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले त्या नंतर त्या पक्षाला सोडून देण्यात आला.