गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी, चंद्रपुर भाजपाने केले निषेध व भीक मांगो आंदोलन.
भाजपा-महिला मोर्चा व भाजयुमोची जोरदार घोषणाबाजी
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- येथील भारतीय जनता पार्टी,चंद्रपुर जिल्हा तर्फे माजी वित्तमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात जटपूरा गेट परिसरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा किंवा त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीला घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या,या”राज्य शासनाचा निषेध व भीक मांगो” आंदोलनात भाजपा,महिला मोर्चा व भाजयुमो च्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.हेच नाहीतर यावेळी कटोरा घेऊन मातृशक्तीने ‘भीक मागितली. यावेळी महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष (ग्रा) अल्का आत्राम, महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष (ग्रा) आशिष देवतळे, जिल्हाध्यक्ष महानगर विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, मंडळ अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, गजानन गोरंटीवार, उषा मेश्राम, ऋषी कोटरंगे, मंजुश्री कासंगोट्टूवार, रवी लोणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी देवराव भोंगळे म्हणाले, ठाकरे सरकारच्या १६ महिन्याच्या कालखंडात, ४ मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. आणि आता १०० कोटी रुपये प्रतिमाह वसुलीच्या आदेशाचा खुलासा होतोय, ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.ही लोकशाही नसून ठोकशाही आहे. मुख्यमंत्र्यांनी ना. देशमुखचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले, मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्रांना मेल पाठवूनच नाही तर प्रत्यक्ष १०० कोटी रु वाझे यांना वसुली करण्यासाठी ना.अनिल देशमुख यांनी सूचित केल्याची माहिती दिली. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे पूर्ण महाविकास आघाडीचा यात सहभाग नाकारता येत नाही.मुख्यमंत्र्यांनी ना.अनिल देशमुख यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी महिला मोर्चाच्या नेत्या अंजली घोटेकर, प्रभा गुढधे, सपना नामपल्लीवार, ती रविदास, रेणू घोडेस्वार, मोनिषा महातव, पूनम गरडवा, माया उईके, शीतल आत्राम, सुषमा नागोसे, किरण बुटले, सौ बात्ते, सौ भडके यांनी सांकेतिक भीक मांगो आंदोलन करीत शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी लोकांनी एकच गर्दी केली.
यशस्वीतेसाठी भाजपा नेते नामदेव डाहूले, विवेक बोढे, विजय आगरे, पारस पिंपळकर, मनोज सिंघवी, चंदन पाल, विनोद खेवले, अमोल खैरे, बबलू सातपुते,सोमनाथ वटाने, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, सुभाष पिंपळशेंडे, महेंद्र जुमडे, प्रमोद शिरसागर, अमोल उत्तरवार, रितेश वर्मा, रामजी हरणे, राम नारायण रविदास, चांद पाशा सय्यद, रामकुमार अकापेलिवार, यश बांगडे,हिमांशू गादेवार, गणेश रामगुंडवार, अमित गौरकर, राजू भोयर, सुनील डोंगरे, आदित्य डवरे, रजिया कुरेशी, राहुल बिसेन, प्रतीक बारसागडे, धनराज कोवे, आकाश ठूसे, मनोज उगेमुगे, देवेंद्र बेले, दिनेश परतेती,स्नेहल लांजेवार, संजय पटले, मनीष पिपरे, अक्षय शेंडे, सुरज सरदम, विनोद मीटघरे, शशिकांत मस्के, प्रवीण उरकुडे, शुभम येडकट यांनी परिश्रम घेतले.