आय.एम.ए.सावनेर शाखा तर्फे कोरोना रुग्णांकरिता प्लाजमा डोनेशन कॅम्पचे आयोजन.

58

आय.एम.ए.सावनेर शाखा तर्फे कोरोना रुग्णांकरिता प्लाजमा डोनेशन कॅम्पचे आयोजन.

 Plasma Donation Camp for Corona Patients Organized by IMA Savner Branch.

✒अनिल अडकीने सावनेर प्रतिनिधी✒
सावनेर-21मार्च:- आय.एम. ए.सावनेर शाखा तर्फे तीव्र कोविंड 19 असलेल्या रुग्णांकरिता प्लाजमा डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी इंडियन अकॅडमी ऑफ इडिया पिडियाट्रिक्स नागपूर शाखेचे अध्यक्ष विजयजी घोटे यांनी या प्लाजमा डोनेशन कॅम्प चे उद्घाटन केले.

गंभीर कोविंड रुग्णांना या प्लाजमा डोनेशन चा नक्कीच फायदा होईल असे मत अध्यक्ष डॉ.निलेश कुंभारे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार डॉ. प्रवीण चव्हाण होते. कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ.अशिष चांडक कोषाध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी, सचिव डॉ.परेश झोपे, सहसचिव डॉ.विलास मानकर उपस्थित होते. आय. एम. ए. सावनेर शाखेचे सदस्य डॉ. विजय धोटे, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. अमित बाहेती, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. संदीप गुजर उपस्थित होते. याप्रसंगी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’ चे सदस्य डॉ. छत्रपती मानापुरे व होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. राहूल दाते उपस्थित होते.

 Plasma Donation Camp for Corona Patients Organized by IMA Savner Branch.

कोविंड प्लाजमा दान शिबीर इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर येथे जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.प्लाजमा घेण्याचे काम जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर चे ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉ.अभिजीत मानकर व श्री किशोर खोब्रागडे यांनी पाहिले.

सावनेरातील डॉक्टरांमध्ये डॉ. परेश झोपे, डॉ. नीलेश कुंभारे व डॉ.अमित बाहेती यांनी प्लाजमा दान केले. याप्रसंगी प्रत्येक प्लाजमा दात्याला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार व अभिवादन करण्यात आले. या शिबिरात 10 प्लाजमा दात्यांनी प्लाजमा दान केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुरेश झोपे यांनी केले.