महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्ह्याचा रोजगार देण्यात प्रथम क्रमांक
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞
भंडारा :- महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्ह्याचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात विकासाचे उत्तम काम सुरु आहे. ११२२ कामावर ८५ हजार ५०९ अपेक्षित मजुरांना काम उपलब्ध करून देण्याचा मोलाचे कार्य भंडारा जिल्हा यांनी केले आहे. महाराष्ट् राज्यात रोजगार देण्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत साकोली, तुमसर, लाखनी, व मोहाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मजुर उपस्थित आहे. रोजगार निर्मितीचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुका स्तरीय आणि गावकरी यंत्रणा जोमाने काम करत आहे.
कोरोना काळात जिल्ह्यातील लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा यासाठी नरेगाची यंत्रणा कार्यरत आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हयात एकूण २ लक्ष ७२ हजार ३४० कुटूंबीयांनी नोदणी केली आहे. पैकी १ लक्ष ६२ हजार ४२२ कुटुंबातील सदस्यांनी कामासाठी मागणी नोंदवली आहे. यामध्ये २ लक्ष ३१ हजार ७५७ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सध्यास्थितीत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची ११२२ कामे सुरु आहेत. प्रतिदिन ८५ हजार ५०९ अपेक्षित मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तालुका निहाय सुरु असलेली कामे – भंडारा तालुक्यातील २२१ कामावर ५३४५ मजुर उपस्थित, लाखांदुर मध्ये १३८ कामावर ८ हजार ६१३ मजुर उपस्थित, लाखणी मध्ये १५३ कामावर १५ हजार ६५७ मजुर उपस्थित, मोहाडी मध्ये १५१ कामावर १९ हजार ६५७ मजुर उपस्थित, पवनी मध्ये १३६ कामावर ७ हजार ४१७ मजुर उपस्थित, साकोली मध्ये १५ हजार ५४४ मजुर उपस्थित, तुमसर मध्ये २२० कामावर १३ हजार २७६ मजुर उपस्थित, असुन एकुण ११२२ कामावर ८५ हजार ५०९ मजुर उपस्थिती असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक नूतन सावंत यांनी कळविले आहे.