शेतकरऱ्यांनी आधारभूत दराने चना या शेतमालाची विक्री करावी – ॲड. सुधीर कोठारी

शेतकरऱ्यांनी आधारभूत दराने चना या शेतमालाची विक्री करावी – ॲड. सुधीर कोठारी

शेतकरऱ्यांनी आधारभूत दराने चना या शेतमालाची विक्री करावी - ॲड. सुधीर कोठारी

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट : हंगाम २०२१-२२ साठी केंद्र शासनाने चना या शेतमालाची आधारभूत किंमत रु. ५२३०/- निश्चित केली आहे. सदर मालाची आधारभूत दराने विक्री करीता बाजार समितीने माहे फरवरी २०२२ पासून ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती . आधारभूत दराने चना या शेतमालाच्या खरेदीचा शुभारंभ आज दि. २१ मार्च २०२२ रोजी हिंगणघाट बाजार समिती मध्ये ॲड. सुधीर कोठारी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळेस काटापूजन करून प्रथम चना विक्रीसाठी आननारे शेतकरी श्री. सुधाकर वाघमारे रा. जामनी यांचे शाल व श्रीफळ देउन बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना सद्यःस्थितीत
खुल्या बाजारामध्ये चन्याचे दर हे ७०० ते ८०० रुपयांनी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत दरानेच चन विक्री करावी. त्याकरिता शेतकऱ्याला ऑनलाईन नोंद करणे अनिवार्य केले आहे. ऑनलाईन नोंदणी हिंगणघाट बाजार समितीच्या कार्यालयात सुरू असून सद्या स्थितीत हिंगणघाट केंद्रावर १०१३ शेतकर्यांचे नोंदणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना बाजार समितीकडून चना विक्री करीता आणण्यासाठी मॲसेज विवरीत केला जातो त्यानुसार शेतकऱ्यांनी आपला चना हा शेतमाल खरेदी केंद्रावर विक्री करीता आनायचा आहे. ऑनलाईन नोंदणी करिता सन २०२१-२२ या हंगामातील चना या शेतमालाच्या पेऱ्याची नोंद असलेला डिजिटल सातबारा ,बैंक पासबुक ( राष्ट्रीयीकृत बॅंकेशी आधारकार्ड लिंक असलेले) व आधारकार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

शासनाने निर्धारित केलेल्या मानकानुसारच FAQ दर्जाचा माल ठरउन दिलेल्या मर्यादित वजनानुसार शेतकऱ्याकडून खरेदी केला जाईल. तसेच एके दिवशी एका शेतकऱ्याच्या नावे २५ क्विंटल पेक्षा जास्त माल खरेदी करता येणार नाही . आधारभूत दराने चण्याची खरेदी दि. २९ मे २०२२ पावेतो सुरू राहणार आहे.
या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना सद्यःस्थितीत माल विकायचा नाही आहे परंतु आर्थिक नीकडीमुळे किंवा घरी माल साठवूनुकिसाडठी जागा नसल्याने माल विक्री करण्याशिवाय पर्याय नाही . अशा शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा त्याकरिता हिंगणघाट येथील वखार महामंडळाच्या गोदीमध्ये चना या शेतमालाची साठवनूक करून वखार पावतीसह सन २०२१- २२ या वर्षाचा चना या मालाची नोंद असलेला ७/१२ , आधारकार्ड, बैंक पासबुक, ईत्यादी कागदपत्रांची झेरॉक्स समिती कार्यालयात सादर केल्यास समितीकडून ६% व्याजदरावर प्रचलित दरानुसार ७५% पावेतो तारण कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच समितीकडून उचल केलेले कर्ज ६ महिण्याच्या आत भरना केल्यास ६ महिण्यात वखार महामंडळाकडून आकारण्यात येणाऱ्या गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीकडून संबंधित शेतकऱ्याला अदा करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणी व विक्री संदर्भाने अधिक माहिती करिता तालुका खरेदी विक्रीचे व्यवस्थापक माळोडे यांचे मो, क्र, ९१५८३१३७७७ तर शेतमाल तारन योजनेकरिता समितीचे कर्मचारी नितिन सुटे यांचे मो. क्रं ९९२११९९८१० वर संपर्क साधावा असे आवाहन सभापती ॲड सुधीर कोठारी यांनी केले.
शुभारंभ प्रसंगी बाजार समिती उपसभापती हरिषजी वडतकर, हिंगणघाट खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष दिगांबर चांभारे, राजु भोरे, बाजार समितीचे संचालक मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, शेषकुमार येरलेकर, ओमप्रकाश डॉलीया, उत्तमराव भोयर, राजु सातोकर,राजेश मंगेकर,विनोद वानखेडे, संजय तपासे,अशोक उपासे , राजेश कोचर, बापुराव महाजन, सुरेश वैद्य, पंकज कोचर, सुरेश कातरे, सौ सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे,तसेच एसपी आय प्रतिनिधी स्वपनिल गुजर, व जिल्हा पण कार्यालयाचे संजय आपदेवे, खरेदी विक्री चे व्यवस्थापक राजु माळोदे,बाजार समितीचे सचिव टी. सी. चांभारे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.