हायवा ट्रकच्या धडकेत डॉक्टर पती-पत्नी ठार
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
वरोरा, २२ मार्च: वरोडा ते वणी मार्गावरी शेंबळ गावाच्या शिवारात हायवा ट्रकने कारला समोरून जोरदार धडक देत फरफटत नेले असता कारमधील पती-पत्नी मृत्यू पावले असल्याची घटना 23 मार्च बुधवार दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की (एम एच 34ए एम 4240) या क्रमांकाच्या कार ने वणी येथील डॉ अतुल गौरकार व त्यांच्या पत्नी डॉ अश्विनी गौरकार चंद्रपूर येथून वरोडा नजीकच्या नवीन बायपास रस्त्याने चंद्रपूर येथून वणी येथे जात असताना समोरून येणाऱ्या (एम एच 34 बीझेड2996) या क्रमांकाच्या हायवा ट्रकने समोरून कारला धडक दिली. धडकेनंतर कार जवळपास अर्धा किलोमीटर ट्रकने फरफडत नेली त्यामुळे पती-पत्नी जखमी होऊन कारमध्ये अडकले.
नागरिकांनी दोघांनाही बाहेर काढले असता त्यात अश्विनी गौरकार यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी असलेले अतुल गौरकार यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे नेत असताना भद्रावती जवळ त्यांचाही मृत्यू झाला. अश्विनी गौरकार या उपजिल्हा रुग्णालय वणी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काही दिवसापूर्वीच रुजू झाल्या होत्या अशी माहिती त्यांच्या आप्तेष्टांनी दिली. पुढील तपास वरोडा पोलीस करीत आहे