मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे केरळातील बापाची हरवलेल्या मुलाशी भेट

63

मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे केरळातील बापाची हरवलेल्या मुलाशी झाली भेट

मीडियावार्ता

२२ मार्च: दिनांक 18/03/2023 रोजी पो.उप.नी कुंजीर हे दिवसपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना पोलीस ठाणे हद्दीत भीक मागणाऱ्या एका बेगर्सला जुहू 01 मोबाईल यांनी बेगर्स कारवाईकरिता पोलीस ठाणेस आणले होते, त्यावेळी मिसिंग पथकातील मपोना-970540/सुर्वे आणि पोलिस उपनिरीक्षक आरंगळे यांना सदर इसमाकडे असणाऱ्या एका पिशवीत काही कागदपत्रे सापडले, त्यावर त्याच्याकडील कागदपत्रांवर असणाऱ्या पत्त्यावरून करूनापल्ली, केरळ येथील पोलीस ठाणेशी संपर्क करून सदर इसमाबाबत माहिती दिली असता सदरचा इसम हा तब्बल 1 वर्षांपासून घरातून निघून आल्याची माहिती मिळाली.

त्यावर करूनापल्ली, केरळ पोलीस ठाणेकडून त्याच्या नातेवाईकांची माहिती घेऊन पोउपनी आरंगळे आणि मपोना सुर्वे यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांचा मुलगा सुखरूप असलेबाबत माहिती दिली, तेव्हा त्याचे वडील नामे राजशेखरण कुटापण, वय 70 वर्ष, राठी- कोल्लम, करूनापल्ली, केरळ हे दिनांक-20/03/2023 रोजी जुहू पोलीस ठाणेस समक्ष आले असता त्यांचा सविस्तर जवाब नोंद करून इसम नामे अनुप राजशेखरण, वय-37 वर्ष यांना सुखरूपपणे त्यांच्या ताब्यात दिले आहे.

त्यावर त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त करून जुहू पोलिस ठाणे यांचे बद्दल विशेष कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच विशेष मिसंग मोहीम पथकाचे पो.उप.नि. आरंगळे, मपोह सुर्वे ,मपोशी भोसले यांचे अभर मानले.