आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

50

आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर व संघटन बांधणीच्या दृष्टीकोनातून जिल्हा, तालुका,शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

खंडू महाले

जळगांव प्रतिनिधी

मो.8767986785

जळगांव -वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी मा.रविकांतजी वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मा.विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर व संघटन बांधणीच्या दृष्टीकोनातून जळगाव पूर्व जिल्हा,तालुका,शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक शहिद अब्दुल हमिद हाॅल पंचशिल नगर,भुसावळ येथे दिनांक 23 मार्च2023 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.‌

सदर बैठकीस सर्व आघाडीतील जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, शहराध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांची व सदस्य यांची उपस्थिती अनिवार्य आहे. बैठकीस येताना आपली नियुक्ती झालेल्या तारखेपासून ते आजपर्यंतचा अहवाल सर्वांनी सोबत आणण्यााचे  आवाहन आले आहे.

 

मा.विनोद सोनवणे

जिल्हाध्यक्ष,जळगाव

मा.दिनेश इखारे

जिल्हा महासचिव

मा.वंदनाताई सोनवणे

महिला आघाडी जिल्हाध्यक्षा

मा.बालाजी पठाडे

माथाडी कामगार युनियन

जिल्हाध्यक्ष