सदानंद येलवे यांची रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगाव : तळा तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे समर्थक सदानंद येलवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष पदी २१ जानेवारी २०२४ रोजी नियुक्ती मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भवनामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. अंतूले यांचे त्यापूर्वी काँग्रेस मधील विश्वासू सहकारी होते. तसेच खा. सुनिल तटकरे खंदे कार्यकर्ते होते.सदानंद येलवे सामाजिक व राजकीय क्षेत्रात दुर्बल घटका पर्यंत जाऊन काम करीत होते. रायगड जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांना परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे.

आता सदानंद येलवे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी कायम आहेत. त्यांच्या आता पर्यंत झालेल्या राजकीय व सामाजिक सेवेचा गुणगौरव करून पक्षाने रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, रायगड जिल्हा निरीक्षक प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.