म्हसळ्यात काजू बियांची आवक वाढली.
खवय्यांची काजू बी घेण्यासाठी लगबग
✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा :- सगळ्यांच्या जेवणात आवडता पदार्थ म्हणजे ओल्या काजू बियांची भाजी, सध्या तालुक्यात ओल्या काजू बियांचा हंगामा बहरला असुन तालुक्यात तसेच शहरात काजू बियांची आवक वाढलेली दिसत आहे. सुरुवातीला २०० ते २५० रुपये शेकडा मिळणारी काजू गर आता १८०ते १५० रुपये शेकडा मिळत असल्याने खवय्यांची काजू गर घेण्यासाठी लगबग दिसून येत आहे, म्हसळा शहरात आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात म्हसळा बाजारात काजू गर विक्रीसाठी आणताना दिसतात, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले म्हसळा तालुका आजुबाजूला डोंगराळ भाग, मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात, त्यातच आंबा व काजू याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, या आदिवासी महिला पोटापाण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळपासून रानावनात फिरुन खूप मेहनत करून थोड्या फार प्रमाणात काजू बी गोळा करून त्या फोडून मग बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. पर्यटकांना देखील हा रानमेवा खाण्याची भुरळ पाडली आहे, स्थानिक यांच्या सह पर्यटक देखील काजू गर घेण्यासाठी गर्दी करताना दिसतात.
—————————————
सकाळपासून रानावनात फिरुन खूप मेहनत करून थोड्या फार प्रमाणात आम्ही काजू बी गोळा करून एक ठिकाणी बसून त्या बिया फोडून त्यामधील गर काढला जातो व नंतर बाजारात विक्रीसाठी आणले जातात या मध्ये काजू बी मधील चिकट पदार्थ आमच्या हाताला चिकटला जातो तो लवकर निघत नाही, आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते.
काजू गर विक्रीते महिला.
————————————
सध्या काजू गर यांची बाजारात आवक वाढल्याने दर देखील कमी आहे. यंदा आवक वाढल्याने खवय्ये देखील काजू गर आवडीने घेऊन जातात. व आम्ही मुंबई तसेच पुणे येथे देखील नातेवाईक यांना काजू गर पाठवितो.
म्हसळेकर.