आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना दैनिक मिडिया वार्ताचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.. संपादक भागुराम सावंत

आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना दैनिक मिडिया वार्ताचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.. संपादक भागुराम सावंत

आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना दैनिक मिडिया वार्ताचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.. संपादक भागुराम सावंत

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:दि.२८मार्च रोजी मुंबई वाकोला येथे संपन्न होणाऱ्या दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मांदाटणे ग्रामपंचायत चे आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना जाहीर करण्यात आला आहे, दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार तळागाळातील सामाजिक काम करणारे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना या छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे दैनिक मिडिया वार्ता चे संपादक भागुराम सावंत यांनी सांगितले,या सन्मान सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, अतिशय दिमाखदार सोहळा होणार असून या साठी आमच्या सर्व पत्रकारांनी खूप मेहनत घेतली आहे असे देखील सावंत यांनी सांगितले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे व विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे,याच सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव देखील पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.यंदाचा मिडिया वार्ता यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार मांदाटणे ग्रामपंचायत चे आदर्श सरपंच चंद्रकांत पवार यांना जाहीर झाल्याने ग्रामपंचायत मांदाटणे येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले व सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.पवार यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात न राहता काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने शेती कडे वळले, नवनवीन प्रयोग केले शेतीविषयक मार्गदर्शन घेतले, तज्ञाचा सल्ला घेतला, शेतीविषयक आधुनिक पध्दतीने शेती करून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळु लागले, तसेच गावचा सरपंच या नात्याने गावामधील जनतेला देखील शेतीविषयक महत्त्व पटवून रोजगार उपलब्ध करून दिला नुकतेच चंद्रकांत पवार यांना स्वप्नल फाऊंडेशन च्या वतीने कृषिरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे
—————————————-
माझ्या कामाची दखल घेऊन मला दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मला जाहीर झाला आहे आणि तो देखील महाराज यांची जयंती साजरी होणार त्या दिवशी पुरस्कार मिळणार आहे मला खूप आनंद वाटत आहे तसेच मी दैनिक मिडिया वार्ता न्युज च्या संपादकांचे देखील आभार व्यक्त करतो की या पुरस्कारासाठी माझी निवड केलीत .
चंद्रकांत पवार.
सरपंच .
मांदाटणे ग्रामपंचायत