संविधान बचाव संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्रा ! म्हणाले महाविकास आघाडीत वंचितला घ्या, .. अन्यथा आम्ही आपला सक्षम उमेदवार उभा करू !

संविधान बचाव संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्रा ! म्हणाले महाविकास आघाडीत वंचितला घ्या, .. अन्यथा आम्ही आपला सक्षम उमेदवार उभा करू !

संविधान बचाव संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्रा !

म्हणाले महाविकास आघाडीत वंचितला घ्या, .. अन्यथा आम्ही आपला सक्षम उमेदवार उभा करू !

संविधान बचाव संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्रा ! म्हणाले महाविकास आघाडीत वंचितला घ्या, .. अन्यथा आम्ही आपला सक्षम उमेदवार उभा करू !

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : संविधान बदलविण्यासाठी भाजप लोकसभेत ४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पाठविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. राज्यातील महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावे आणि भाजपाचा महाराष्ट्रात पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र निवडणूक लढवावी.

मात्र, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून न घेतल्यास, भाजपला विरोध दर्शविण्यासाठी आणि भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती आपला सक्षम उमेदवार उभा करेल, असा निर्वाणीचा इशारा संविधान बचाव संघर्ष समितीने  महाविकास आघाडीला दिला आहे.  

*म्हणाले महाविकास आघाडीत वंचितला घ्या..अन्यथा आम्ही आपला सक्षम उमेदवार उभा करू*

भंडाऱ्यात महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांना उमेदवारी द्यावी, तेच भाजपला पराभूत करू शकतात. तसेच  वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून भाजपचा सर्वत्र पराभव करावा, अशी मागणी संविधान बचाव संघर्ष समितीने केली आहे. ते आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत समाविष्ट न केल्यास आम्ही देखील भाजपला विरोध दर्शविण्यासाठी आणि भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी आपला सक्षम उमेदवार उभा करू, असा इशाराही संविधान बचाव संघर्ष समितीनं पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीला दिला. 

*वंचित सोबतची चर्चा फिस्कटली?*

एकीकडे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्यातच जमा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. याचं कारण म्हणजे, आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेली होती. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांची भूमिका वेगळी आहे, अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील मतमतांराची कल्पना दिली. त्यामुळे वंचितसोबतची महायुतीची चर्चा फिस्कटल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

*बीआरएस आणि वंचित लोकसभेसाठी गाठ बांधणार?*
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा ॲक्शन मोडवर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.

महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिसकटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झाली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचित सोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे कळते. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केले होते.