विहिरीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

विहिरीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

♦️अत्याचार करुन हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

भद्रावती : 22 मार्च
तालुक्यातील चोरा येथील शेत शिवारातील विहिरीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतक मुलगी 14 वर्षाची असून, चोरा येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र, मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर मृतदेहाला विच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भद्रावती पोलिस ठाण्याला भेट दिली. या घटनेमुळे काही काळ पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेची सत्यता समोर येईल. घटनेचा पुढील तपास ठाणेदार लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनात गजानन तूपकर, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, खुशाल कावडे, रोहित चिटगीरे, योगेश घाटोडे करीत आहेत.