माता महाकालीच्या यात्रेकरूंसाठी 2.90 कोटींचा निधी मंजूर

माता महाकालीच्या यात्रेकरूंसाठी 2.90 कोटींचा निधी मंजूर

🔺आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
🔺 भाजपा महानगरकडून मुनगंटीवार यांचा सत्कार

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 22 मार्च
चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्‍या यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस पाठपुरावा करत राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेतला. त्याबद्दल भाजपा महानगरच्या वतीने आ. मुनगंटीवार यांचा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
आ. मुनगंटीवार कायमच चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी झटत आले आहेत. प्रत्येकवेळी विविध विकासकामांसाठी त्यांनी निधी खेचून आणला आहे. आता माता महाकाली यात्रेकरूंसाठी मंजूर करण्यात आलेला 2.90 कोटींचा निधीदेखील त्यांच्या जनसेवेवरील निष्ठेचे प्रतिक आहे, या शब्दांत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रामपाल सिंग, सविता कांबळे, मनोज पोतराजे, धनराज कोवे, संदीप आगलावे, शीला चव्हाण, सुनील डोंगरे आदींची उपस्थिती होती.
माता महाकाली यात्रेकरूंना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजपा महानगरकडून आ. मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी अधिकार्‍यांसह तातडीने झरपट नदीच्या पाहणीसाठी विशेष दौरा आयोजित केला. या पाहणीत संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
======
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
पाहणीदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधांसाठी आवश्यक बाबी लक्षात घेण्यात आल्या. त्यासंदर्भात मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटत यात्रेकरूंच्या अडचणी लक्षात आणून दिल्या. आ. मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत 2 कोटी 90 लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला.
==========