वंचित बहूजन आघाडीचे नेते राहुल भालेराव यांचे कोरोनाने निधन.

49

वंचित बहूजन आघाडीचे नेते राहुल भालेराव यांचे कोरोनाने निधन.

वंचित बहूजन आघाडीचे नेते राहुल भालेराव यांचे कोरोनाने निधन.
वंचित बहूजन आघाडीचे नेते राहुल भालेराव यांचे कोरोनाने निधन.

सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी✒
जालना,दि22 एप्रिल:- जालना जिल्हातुन महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी साठी एक दुखत बातमी समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा निरीक्षक व राज्य कमिटी सदस्य, जालना येथील वंचित बहूजन आघाडी आणि जालना जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलन नेते राहुल भालेराव यांचे कोरोनाने निधन झाले. ते जालना शहरातील नागेवाडी येथील रहिवासी होते.

वाघा सारखा धाडसी व्यक्तीमत्व असलेल्या आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ म्हणून सूपरिचीत असलेले, मनमिळावु व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेला.

काही दिवसापुर्वी राहुल भालेराव हे कोरोना वायरस बाधीत झाले होते. जालना शहरात राहुल भालेराव यांना उपचारासाठी रुग्णालय फिरुन पण बेड मिळाला नाही. खासगी रुग्णालयात कुठेच बेड नसल्याने त्यांना जालना जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल तीन दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते व काल त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने व्हेन्टीलेटर ठेवण्यात आले होते व आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे आज त्यांची प्राणज्योत मावळली. राहुलभाऊ भालेराव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी बायको आई असा परिवार होता

आंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ काळाचा आड गेल्याने आंबेडकरी चळवळीचे आणि वंचित बहूजन आघाडीचे भरून न निघणारे अतोनात नुसकान झाल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल.