कळमेश्वर नगर परिषद अंतर्गत शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य डुकरांचा सुळसुळाट डासांचा भडीमार.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
कळमेश्वर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर नगर पालिका अंतर्गत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य तयार झाली आहे. डुकरांचा सुळसुळाट झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. नाल्यात तुडुंब भरल्या असल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे. परंतु येथील नगर परिषद अध्यक्ष व मुख्य अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
कळमेश्वर नगर पालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे आज लोकं मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे. आज नगर पहिला लोकांचा जीवाचा खेळखंडोबा करुन याकडे लक्ष देण्यास तयार नाही गेल्या अनेक दिवसापासून गोतमारे लेआउट मधील श्रीराम भाऊ यांच्या घराजवळ असलेल्या खाली प्लॉट मधील घरासमोरील कचऱ्याचे ढिगारे सांडलेले दिसून येते, पाण्याचे गटार व नाल्यात तुडुंब भरलेले असल्यामुळे डुकरांच्या सुळसुळाट पाहायला मिळत आहे. तिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासन मोठ्या प्रमाणात नियमाचे पालन करा, लॉकडाऊन करा, दुकाने बंद करा अशा अनेक घोषणा करत असताना कळमेश्वर नगरपालिका झोपेचे सोंग घेऊन आहे. झोपी गेलेल्याला जागे करता येते.. पण लोकांचा आरोग्याशी खेळणारे नगर पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असेल तर त्याला जागे कोन करणार? अशा प्रश्न जनता विचारत आहे.
आज जिल्हात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. अनेक लोकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतल आहे. आता कळमेश्वर शहरांमध्ये डासांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे सर्दी खोकला पडसे निंमूनीया या यासारखे रोग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसत आहे परंतु अनेक दिवसापासून नगरपालिकेत हद्दीमध्ये फवारणी झाल्याचे दिसत नसल्याचे या रोगाला वाव मिळत आहे. या गंदगीकडे नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष व नगरपरिषद कर्मचारी लक्ष देतील की नाही अशी चर्चा शहरांमध्ये जोरदार सुरू आहे.