कविता: मदतीचा हात मयूर शेळकेचा…
मदतीचा तुझा हात पाहून आज
आशीर्वादासाठी उंचावले हात
जीवनदान देऊन लेकराला
तू दाखवली माणुसकीची जात…
माणुसकी तुझी पाहून
आमचे ऊर आले भरून
कुठेही जरी असशील तू
घे आशीर्वाद आमचे भरभरून…
पैसा जीवाचा सुटत नाही
पण तू दान केले अंध आईला
आयुष्यात खूपच बरकत मिळेल
मित्रा तुझ्या सर्व कमाईला…
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
तू वाचवले कोवळ्या जीवाला
मनापासून चला वंदन करू
आपल्या या निस्वार्थी भावाला…
भाऊ, तुझ्यासारखे खूपच
कमी आहेत अशी लोकं
तुझ्या या कार्यापूढे आम्ही
झुकवतोआमचं डोकं..
कवी: गणेश रामदास निकम सर
चाळीसगाव गणेशपूर
मो.न.७०५७९ ०४६७७, ९८३४३ ६१३६४