रणमोचन मोहनदास बाबाच्या नावाने गाव बंद: जनता कर्फुला प्रतिसाद, शासनाचे नियमाचे पालन होणार
रणमोचन मोहनदास बाबाच्या नावाने गाव बंद: जनता कर्फुला प्रतिसाद, शासनाचे नियमाचे पालन होणार
रणमोचन मोहनदास बाबाच्या नावाने गाव बंद: जनता कर्फुला प्रतिसाद, शासनाचे नियमाचे पालन होणार
केवळ पूजारीच करणार पूजाअर्चा: रणमोचन येथील ग्रामस्थांचा निर्णय
रणमोचन मोहनदास बाबाच्या नावाने गाव बंद: जनता कर्फुला प्रतिसाद, शासनाचे नियमाचे पालन होणार
रणमोचन मोहनदास बाबाच्या नावाने गाव बंद: जनता कर्फुला प्रतिसाद, शासनाचे नियमाचे पालन होणार
अमोल माकोडे, ब्रम्हपुरी प्रतिनिधी
 ब्रम्हपुरी:- तालुक्यातील रणमोचन (खरकाळा ) हे गाव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. या ठिकाणी यांच्यासारखे अनेक संत महा्राज येऊन गेले तर रणमोचन वासियांचे येथील मोहनदास महाराजाचे समाधी स्थळ श्रद्धा स्थान आहे.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत व अशा अनेक महामारीत गावातील लोक मोहनदास बाबाजीच्या नावाने गावात बंद ठेवण्यात येते. ज्याठिकाणी पूजा-अर्चा करून त्यांच्यावर विश्वास ठेवीत येणाऱ्या प्रकोपापासून आपल्या गाव वासियांचा बचाव होईल यासाठी यज्ञ करून धुनी पेटवली जाते. मात्र गावातील ठेवलेल्या निर्णय ग्रामस्थ पालन करतात त्यादिवशी मात्र गावातील लोक कुठेही बाहेर जात नाही आणि त्यासाठी बंद ठेवली जाते. जेव्हा जेव्हा गावाचे मोहनदास बाबाजीचा धावा करतात तेव्हा तेव्हा गाव व त्यांच्या मदतीसाठी महाराज नक्की धावून येतात. असा विश्वास आजही रनमोचन येथील
ग्रामस्थांना आहे. 
मागील वर्षीपासून कोरोनाने देशासह राज्य आणि जिल्हे व तालुक्यातील अनेक गावात सुद्धा कोरोना सारख्या महामारी ने लोक हतबल झाले आहेत. ही महामारी रनमोचन गाव सुरक्षित राहावे महामारीचा प्रकोप अपल्या गाव़ावर येऊ नये  कदाचित आलाच तर तो कायमचा गावातून नष्ट व्हावा ह्या उदांत हेतूने रणमोचन गावामध्ये दिनांक 22 एप्रिल रोजी गुरुवारला बंद पाळण्यात येत असून कोणीही गावाबाहेर पडू नये अशा सूचना ग्रामस्थांतर्फे करण्यात आल्या असून गावा बाहेर नागरिकांनी जाऊ नये. यासाठी  गाव वाशीयाकडून बंदी लावण्यात येणार आहे. केवळ हा एक श्रद्धेचा भाग म्हणून पूजेचे कार्य होते एवढे मात्र खरे! संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाने हाहाकार माजला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यू लावण्यात आला. जनता करफूला गावकऱ्यांनी 100% प्रतिसाद दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here