पोहेगाव येथे अंगणवाडी सेविकांसाठी शाळा पूर्व प्रशिक्षण शिबिर
सुनील भालेराव
कोपरगाव- पोहेगाव प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुली येथे शाळा पूर्व प्राथमिक प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी पोहेगाव, सोनेवाडी, नगदवाडी ,चांदेकसारे, देर्डे मढी, जवळके, रांजणगाव परिसरातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा . मा. प्राचार्य दिघे सर, मा. राऊत मॅडम त्याचप्रमाणे प्रशिक्षणाधिकारी -मा.खारोटे सर मा.अडांगळे सर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका – वर्षाताई निकम ,शारदा गरुड, विजया औताडे ,अर्चना कासार, रेखा भालेराव ,उज्वला भालेराव ,सीमा मोरे, विद्युलता मोकळ , सुमन औताडे ,अर्चना रहाणे ,जयश्री रहाणे, सुनंदा औताडे , अनिता गांगुर्डे, अनिसा शेख इत्यादी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या .मुलांच्या मनामध्ये शाळेबद्दलची भीती दूर होऊन मुले दररोज शाळेत येतील या संदर्भात अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुलांच्या मनातली भीती दूर होण्यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी माहिती देण्यात आली .