रिऍलिटी क्वाटर्स आयोजित रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड सोहळा मुंबईत दिमाखात संपन्न

65

रिऍलिटी क्वाटर्स आयोजित रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड सोहळा मुंबईत दिमाखात संपन्न

मीडियावार्ता
२२ एप्रिल, मुंबई: पवनसिंग चौहान स्थापित रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारी रिऍलिटी क्वाटर्स आयोजित रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड सोहळा मुंबईमध्ये २१ एप्रिलला संपन्न झाला. विलेपार्ले मधील द ऑर्किड हॉटेलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलीवूड मधील अनेक व्यवसायिकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.

सदर सोहळयाला मुख्य अतिथी म्हणून माजी मंत्री कृपाशंकर सिंह, भाजप मुंबई सेक्रेटरी दिव्या ढोले, प्रोड्युसर इराम फरीदी,अमित राणे आदी मान्यवर हजर होते. माजी मंत्री कृपाशंकर सिंह आणि फॉउंडर पवनसिंग चौहान यांच्या हस्ते देशभरातून आलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिकांचा रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.

सोहळ्या दरम्यान मान्यवरांनी भारतीय रिअल इस्टेट मार्केट आणि भविष्यातील आव्हाने या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पॅनल चर्चेच्या माध्यमातून तद्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रासंबंधी उपस्थितीतांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. रिऍलिटी क्वाटर्सच्या पवनसिंग चौहान आणि शाहिस्ता अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली सादर सोहळ्याचे यशस्वीपाने पार पडला.