एन एम एम एस परीक्षेत को. ए.सो.गं.द. आंबेकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश
✍️रामदास चव्हाण ✍️
महाड तालुका प्रतिनिधी
📞72767 05457📞
बिरवाडी महाड : राष्ट्रीय स्तरावर नुकत्याच झालेल्या NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा -2023) परीक्षेत को.ए.सो. गं.द. आंबेकर हायस्कूलमध्ये शिकणारी कुमारी शिवश्रुती धनंजय गोंड या विद्यार्थिनीने सर्वसाधारण प्रवर्गातून जिल्ह्यातून 9 वा व ओबीसी प्रवर्गातून 4 था क्रमांक मिळविला.. तर कुमारी सिद्धी गणेश मोरे या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून 18 वा क्रमांक मिळविला..
कुमारी शिवश्रुती धनंजय गोंड या विद्यार्थिनीने राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंट्री परीक्षेत देखील ए ग्रेड मिळवला.. शिवश्रुती ही विद्यार्थिनी शालेय व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवीत असते.. ती अशीच अतिशय गुणी व हुशार मुलगी आहे.. तिच्या यशामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांचा व तिची आई सौ नंदा गोंड यांचा मोलाचा वाटा आहे..या विद्यार्थिनींनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल शाळा समितीचे सभापती श्री सतीशजी मोरे, प्राचार्य श्री शंकर राठोड सर, शाळा समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन केले.. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.