आदर्श पतसंस्थेचे सीमोल्लंघन आदर्शची पुणे शाखा सुरू
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-अलिबाग मधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने पुणे शहरातील वारजे येथे आपली शाखा सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याबाहेर आपली शाखा सुरू करून आदर्श पतसंस्थेने रायगडची सीमा ओलांडून सीमोल्लंघन केले आहे.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग तालुक्यात 12 शाखा आहेत. अलिबाग तालुक्याच्या बाहेर रायगड जिल्ह्यात 6 शाखा आहेत. रायगड जिल्ह्यात आदर्शच्या 18 शाखा आहेत. आदर्शने आपली 19 वी शाखा जिल्ह्याच्या बाहेर पुणे शहरात सुरू केली. या शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 20) करण्यात आले.
सहकार व बँकिंग तज्ञ मा. विद्याधर अनास्कर, जनता सहकारी बँकचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रदीप (बाबा ) धुमाळ, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी नगरसेविका वृषालीताई चौधरी , आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संस्थेचे संचालक सतीश प्रधान , विलाप सरतांडेल , अँड. रेश्मा पाटील , अँड . वर्षा शेठ , रामभाऊ गोरीवले , महेश चव्हाण , संजय राऊत सीए , डॉ. मकरंद आठवले , तसेच संस्थेचे मार्गदर्शक व कंसल्टंट नितीन वाणी सर , मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे काम नावा प्रमाणे आदर्श आहे. या पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. कोकणातील एक पतसंस्था पुण्यात आपली शाखा सुरू करते हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सहकार व बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी काढले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र रायगड,ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई ,पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आता एकुण 19 शाखा सुरु आहेत. 2035 पर्यंत 39 शाखा सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे . मार्च 2026 पर्यंत आदर्शचा एकत्रित व्यवसाय 1000 हजार कोटी करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे, असे आदर्शचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
आदर्शचे संस्थापक सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आदर्श पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.तसेच पुणे शहारात आदर्श पतसंस्थेची शाखा सुरू करण्या मागचा उद्देश सांगितला. संस्थेचे मार्गदर्शक व कंसल्टंट नितीन वाणी सर यांनी आदर्श पतसंस्था बँके प्रमाणेच कार्य करीत असून नियामक मंडळाने केलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून काम करून गेले तीन वर्ष ग्रॉस एनपीए प्रमाण १ टक्क्याच्या आत राखले असून बँकांप्रमाणे कर्जदारांची नोंदणी सरसाई वर करणारी आदर्श पतसंस्था असून संस्थेने कन्सॉर्शियम कर्ज योजना चांगल्या प्रकारे राबविली असल्याचे सांगितले
संस्थेचे उपाध्यक्ष व.