प्रचंड गदारोळात थेट सरपंचाचे आरक्षण सोडत

प्रचंड गदारोळात थेट सरपंचाचे आरक्षण सोडत

62 पैकी31ग्रामपंचायतीवर महिलाराज

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील 62ग्रामपंचायत मध्ये 2025- 2030 या कालावधीत थेट सरपंच यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत करण्यात आली. या सोडतीत आरक्षण निश्चित केली जात असताना अनेक ग्रामस्थांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने गदारोळ सुरू झाला. दोनवेळा सभा तहकूब करावी लागली. जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर चार वाजता पुन्हा ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र या आरक्षण सोडण्याची विरुद्ध अनेकांनी आपली तक्रार नोंद केली आहे.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायती पैकी तब्बल 31 ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच यांच्यासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.

थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाने सोडत कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित केला होता. आरक्षण सोडत सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत हरकत घेतली असता प्रांताधिकारी चव्हाण यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांचा मार्गदर्शन घेऊन व निवडणूक आयोगाने घालून दिलेले गाईडलाईन यांची माहिती दिली आणि 2021 मध्ये झालेल्या आरक्षण सोडत ही बाद ठरवण्यात येत असून यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी आता आरक्षण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे 2021 मध्ये थेट सरपंच यांच्या आरक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आरक्षण हे रद्द ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रांत अधिकारी चव्हाण यांनी नी आरक्षण सोडती काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग 17 ,सर्वसाधारण वर्गासाठी 33 आरक्षित जागा निश्चित केल्या.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीमधील 31 ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जमाती 6, नागरिकांचा मागास प्रवर्ग 8, सर्वसाधारण 16 अशा 31 ग्रामपंचायत मधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली. त्या सोडतीसाठी कुमारी आदिश्री शिंदे या बालिकेने चिठ्ठी उचलल्या अनुसूचित जातीसाठी आंबेपूर, अनुसूचित जमाती महिला राखीव मध्ये आवास, ढवर, चिंचोटी, कावीर, पेंढाबे, वैजाळी तर अनुसूचित जमाती खुल्या गटासाठी मानतर्फे झिराड, पेझारी,नागाव, मानकुळे, शहापूर यांची निवड करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी 8 महिला आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये नवगाव, रेवदंडा, कीहिम, परहुर, वाडगाव, रांजणखर डावली, शहाबाज ,खंडाळे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या गटात वाघोडे, धोकवडे, शिरवली, आगरसुरे, कुरकुंडी कोलटेबी, सहाण, चिंचवली, मिलकतखार, बेलोशी यांचा समावेश होता. सर्वसाधारण गटातून 16 महिला आरक्षित करण्यात आल्या त्यामध्ये का मारले, रामराज, वेशवी कुसुबळे, रेवस ,आक्षी, मापगाव, कुर्डूस, वाघ्रण, कामार्ले,झिराड, नारंगी, बेलकडे ताडवागळे, चेंढरे, बामणगाव सासवणे तर खुल्या प्रवर्गासाठी कोप्रोली, सातिर्जे, कुरुळ, चौल , श्रीगाव, खिडकी, बोरीस बोरघर ,वरसोली, चरी, वरंडे, थळ, मुळे, सूडकोली, खानाव, सारळ,पोयनाड, वैश्वी या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी तहसीलदार विक्रम पाटील, महाले व इतर कर्मचारी तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामसेवक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.