अखेर चोरी करणार्‍या 4 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; 4 आरोपीना अटक; 48 हजारांचा मुद्देमाल जप्त.

46

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गोंदिया, दि.22 :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आमगाव येथील जिल्हा परिषद शाळा कुंभारटोली येथून 2 वेळा चोरी करणार्‍या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. ही कारवाई गुरुवार, 20 मे रोजी करण्यात आली. आरोपींमध्ये राजकुमार अभय कुमार (वय 30) रा. कुंभारटोली, आमगाव, सुरेश धनराज राऊत (वय 31), राजकुमार गोपीचंद मरकाम (वय 22) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे.

सविस्तर असे की, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील मालमत्ता, चोरी, घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशाने 20 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय व खासगी वाहनाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान दरम्यान गोपनीय सूत्रांनी माहिती दिली की, कुंभारटोली येथील रहिवासी राजकुमार अभय कुमार याने आपल्या काही साथीदारासह जिप हायस्कूल रिसामा/कुंभारटोली (ता.आमगाव) येथील एलएफडी टीव्ही, कॅरम बोर्ड व इतर काही साहित्याची चोरी केली आहे. तसेच चोरीचे साहित्य त्याने स्वतःच्या धिती हॉटेलमध्ये लपवून ठेवले आहे.