14 जूनपर्यंत शिवभोजन थाळी मोफत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोफत देण्याची घोषणा.

55

आशीष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा दिनांक,21:- गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची तारीख वाढविली असून आता 14 जून 2021 पर्यंत मोफत असणार अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवभोजन थाळी देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

सुरुवातीला ही थाळी 10 रुपयांमध्ये देण्यात येत होती मात्र कोरोना काळात नंतर ती 5 रुपयांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करताना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली होती. राज्यात कोरोनाचे संकट असून त्या लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळाले नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी 1 जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी 14जून 2021 पर्यंत मोफत असणार अशी घोषणा केली आहे.