‘मजनू’ चित्रपटाद्वारे प्रेम, संघर्ष, सस्पेन्स विरह यांसारखे विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार – निर्माते गोवर्धन डोलवाडे
संतोष शिवदास आमले
पनवेल तालुका /प्रतिनिधी
9220403509
पनवेल : -‘मजनू’ चित्रपटाद्वारे प्रेम, संघर्ष, सस्पेन्स विरह यांसारखे विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार असल्याची माहिती आज पनवेलमध्ये या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन डोलवाडे
यांनी प्रसार माध्यमांबरोबर बोलतांना दिली.
सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ‘मजनू’ चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १० जून २०२२ जाहीर करण्यात आली आहे. ही एक प्रेमकथा असून त्यातून विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर उघडकीस येणार आहे. हा चित्रपट सहकुटुंब बघता येणार आहे व हा चित्रपट सर्व इतर चित्रपटांचे विक्रम मोडेल असा विश्वास चित्रपटाचे निर्माते गोवर्धन डोलवाडे यांनी व्यक्त केला आहे. तर दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले की, हा चित्रपट म्हणजे एक प्रेम कहाणी असून, शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्या नंतर तेथील बंधमुक्त आणि मौजमजेच्या वातावरणात वावरताना प्रत्येक युवक हा स्वतः ला मजनू समजू लागतो मग ते शहर असो की गाव. प्रेमाची खरी ओळख सर्व तरुण, तरुणांना याच काळात होते, त्यांच्या या भावविश्वावर आधारित ‘मजनू’ हा चित्रपट फक्त प्रेमकहाणी नसून एक परिपूर्ण पॅकेज असल्याचे सांगितले. तर या चित्रपटाचे मुख्य कलाकार रोहन पाटील यांनी सांगितले की, हा माझा दूसरा चित्रपट असून यापूर्वी मी धुमस या चित्रपटात काम केले आहे. माझ्या सोबत सहकलाकार म्हणून स्वेतलाना अहिरे तसेच नितीश चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट माझ्यासाठी महत्वाचा असून हा माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट असणार असल्याचे त्यांनी सांगितले तर सहनिर्माते पनवेलचे इरफान.एम.भोपाली यांनी सांगितले की, सिनेक्षेत्रात उत्तुंग भरारी घेत मराठी फिल्म इंडस्ट्री मॉलीहुड करण्याचे स्वप्न असून सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ‘मजनू’ हा चित्रपट दि. १० जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा आपल्या घरातील चित्रपट असून मराठी चित्रपट करणे हे माझे पूर्वीपासूनचे धैर्य होते ते आज पूर्ण होत आहे. मराठी प्रेक्षकांसाठी व सहकुटुंब बघता येईल असा हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत. या चित्रपटात नवीन कलाकारांसह नामांकित अश्या कलाकारांना सुद्धा संधी दिली आहे. या चित्रपटाला संगीतकार पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन विशाल यांचे संगीत लाभले आहे तर गीतकार दीपक गायकवाड आणि गोवर्धन दोलताडे यांच्या गीतांना इंडियन आयडॉल फेम सलमान अली, आदर्श शिंदे, संदीप उबाळे, बेला शेंडे,आनंदी जोशी व विशाल चव्हाण यांचा स्वरसाज लाभला आहे. संकलन चेतन सागडे यांनी केले असून, कला दिग्दर्शक महेश कोरे, डिओपी एम. बी. अळ्ळीकट्टी, साउंड डिझायनर राशी दादा बुट्टे, कॉस्च्युम डिझायनर संदीप गाजुल, पार्श्वसंगीत विनीत देशपांडे यांचे तर कोरिओग्राफर हाईट मंजू आहेत. त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास सहनिर्माते पनवेलचे इरफान.एम.भोपाली यांनी व्यक्त केला आहे.
फोटो : ‘मजनू’ चित्रपटातील मुख्य कलाकारांसह इतर मान्यवर