गोडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत
शरद कुकुडकर
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो नं 9518727596
गोंडपिपरी :-राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड व नालीचे बांधकाम करण्यात यावे याबाबत भंगाराम तळोधी ग्रामपंचायत सदस्य अनिता पोटे यांच्यासह ग्रामस्थांनी काल दिनांक 21 मे रोज शनिवार ला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना निवेदन दिले मक्ता येथील काशिनाथ पोटे ते सुधाकर कुबडे रोडकडे यांच्या घरापर्यंत जाणार्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे सदर रस्त्यावर जाणे येणे करण्यास नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने येथे सिमेंट काँक्रेट व नाली मंजूर करावी अशी मागणी आमदार धोटे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिनू कंदुरवार यांच्यासह ग्रामस्थ निवेदन देतांना उपस्थित होते