ताडोबात उद्या निसर्गप्रेमी घेणार बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’ 🌳🏞️ 🛑 🔭 ८९ मचानांवरून केली जाणार प्राणी गणना 🐅🐘

ताडोबात उद्या निसर्गप्रेमी घेणार बुद्ध पौर्णिमेनिमित्त 'निसर्ग अनुभव' 🌳🏞️ 🛑 🔭 ८९ मचानांवरून केली जाणार प्राणी गणना 🐅🐘

ताडोबात उद्या निसर्गप्रेमी घेणार बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’ 🌳🏞️

🛑 🔭 ८९ मचानांवरून केली जाणार प्राणी गणना 🐅🐘

ताडोबात उद्या निसर्गप्रेमी घेणार बुद्ध पौर्णिमेनिमित्त 'निसर्ग अनुभव' 🌳🏞️ 🛑 🔭 ८९ मचानांवरून केली जाणार प्राणी गणना 🐅🐘

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

ताडोबा : 22 मे
वन्य जीवप्रेमी बुद्ध पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहात असतात. कारण या दिवशी दरवर्षी वन खात्यातर्फे वन्यजीव गणना होत असते. मचाणावरून होणाऱ्या वन्यप्राणी गणनेसाठी आगाऊ नोंदणी केली जाते. संपूर्ण विदर्भातील जंगलात ही प्राणीगणना केली जाते.

ताडोबा_अंधारी_व्याघ्र_प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये गुरुवार, २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात ८९ मचाणांवरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’ या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.

एका मचाणवर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते. निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचाणांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.