दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
• भद्रावती तालुक्यातील घटना
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
भद्रावती : 22 मे
दारू सोडण्याची औषध खाल्ल्याने भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे राहणार्या दोघांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवार, 22 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सहयोग सदाशिव जीवतोडे (19), प्रतीक घनश्याम दडमल (26) अशी मृतकांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (45) व सोमेश्वर उद्धव वाकडे (35) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दारुने व्यसनाधीन झालेले गुडगाव येथील चार जण वर्धा जिल्ह्यातील शेडगाव येथील एका शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी 21 मे रोजी सकाळी नऊ वाजता गेले होते. तिथे महाराजांनी दारू सोडण्याची औषध दिली. त्यानंतर ते सायंकाळी आपल्या गावी गुडगाव येथे परत आले. त्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण. सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावतीचे ठाणेदार विपिन इंगळे यांना होताच त्यांनी खासगी रूग्णालयात भेट दिली. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात येथे आणण्यात आले. ज्या औषधीमुळे दोघांचा जीव गेला, याचा तपास केला जाईल, उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांनी भेट दिली.