रायगड च्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल

रायगड च्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची वर्णी लागली असून दोन लेडी सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी असणार आहे.
रायगड पोलीस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलीस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलीस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगडनंतर आता अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.
धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान असणार आहे.