वनपरिक्षेत्र नेरळ कार्यालय व तपासणी नाका शेलु याचे गणेश नाईक (मंत्री-वने) यांच्या हस्ते उद्घाटन….

वनपरिक्षेत्र नेरळ कार्यालय व तपासणी नाका शेलु याचे गणेश नाईक (मंत्री-वने) यांच्या हस्ते उद्घाटन….

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

वनपरिक्षेत्र अधिकारी, माथेरान स्थित नेरळ कार्यालय तसेच तपासणी नाका शेलू या नूतन इमारतींचे उद्घाटन सोहळा दिनांक २२ मे २०२५ रोजी वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय माथेरान या नूतन इमारतीचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत वन हक्क कायदा २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती तथा पारंपारिक वननिवासी यांच्या सोयी सुविधांसाठी मंजूर वन जमीन मागणी प्रस्तावाची सनद वाटप करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्त्याच्या सुविधेपासून वंचित राहिलेल्या कळकराई व वाघिणीची वाडी या आदिवासी गावाला वन जमिनीतून रस्ता मंजुरीची सनद वाटप आणि वनसंरक्षण व वनसंवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले. स्वच्छ समुद्र किनारे उपक्रमांतर्गत नागाव ग्रामपंचायत तालुका अलिबाग यांच्यासोबत ब्लू फ्लॅग सेलिब्रेशन इनिशेटिव्ह करिता वनविभागाच्या समस्यांवर करा ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन करिता नोंदणी करणारी नागाव ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

वन विभागामध्ये वनवे वृक्षारोपण अतिक्रमण निर्मूलन वनांच्या हद्दीकुणा इत्यादीसाठी एआय टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्याकरता युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी यांच्यासोबत सामांजस्य करार मंत्री मोहदाच्या हस्ते गणवेश व नाविन्यपूर्ण संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. वांगणी ते कर्जत या भागामध्ये अपघात होत असल्यामुळे येथील वनजमीन ही महामार्गासाठी खुल्या करण्याची मागणी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी वांगणी ते कर्जत या दरम्यान वना जमीन महामार्गास अडथळा निर्माण करत आहे व त्यामुळे अपघात होत आहेत तसेच येथे सुसज्ज असं गार्डन व्हावं अशी मागणी आमदार थोरवे यांनी केली व त्यास मंजुरीही देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे, वनविभाग प्रधानमंत्री वनरक्षक तथा वनबल प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास ठाणे, वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक श्रीमती के. प्रदीप, उपविभागीय अधिकारी श्री संकपाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी टेळे उपविभाग व तालुका स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी नेरळ ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर, तसेच ग्रामसेवक अरुण कार्लेकर, नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.