ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये काँग्रेसतर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात “तिरंगा रॅली”चे आयोजन करण्यात आले.
ही रॅली राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते प्रियदर्शिनी स्व. इंदिरा गांधी चौक या मार्गावर काढण्यात आली. या रॅलीत खा.प्रतिभाताई धानोरकर, आ.विजय वडेट्टीवार, आ.अॅड.अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष मा.आ.सुभाष धोटे महिला कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनंदा ताई धोबे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमाद्वारे देशभक्तीची भावना जागृत करत, शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.