अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गोळ्या देऊन केला गर्भपात

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा :22/06/2021 पीडितेवर अत्याचार करुन तिला गोळ्या देत गर्भपात केल्याची घृणास्पद घटना कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली. या घटनेने समाजमन्न सुन्न झाले. अवघ्या दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पीडितेला कमलेश नामक युवकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष देत तिच्यावर तब्बल दोन वर्षे अत्याचार केला.
यात पीडितेला गर्भधारणा झाली. दरम्यान कमलेशने तिला अनधिकृतरित्या गोळ्या देत गर्भपात केला. पीडितेने लग्नाची गळ घातली असता तिला वारंवार त्रास देत मारण्याची धमकी दिली. तसेच लग्न करण्यास नकार दिला. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार कारंजा पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी कमलेशविरुद्ध कलम 376, 3, 313,323, 506 भादवी सहकलम 4,6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे