एकनाथ शिंदे 35 आमदारांसोबत गुवाहाटी येथे रवाना
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 32 आमदार व प्रहार पक्षाचे 2 असे एकूण 35 आमदार घेऊन गुवाहाटी येथे रवाना झाले. निघण्या अगोदर एकनाथ शिंदेंसह आमदारांचे फोटो व्हायरल झाले असून सुरतच्या हॉटेलमध्ये काढला ग्रुप फोटो एकनाथ शिंदे यांनी 35 आमदार असल्याचा दावा केला 2 महिला आमदारांचाही समावेश, मंत्री बच्चू कडू यांचाही समावेश आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील ह्यांनी कल स्पष्ट केले होते की ह्या घटनेचा भा ज पा शी काहीही सम्बन्ध नाही परंतु आमदार वास्तव्यास असलेल्या ली मेरीडिंन हॉटेल तसेच सुरत मविमानतळ येथे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मोहित कँबोज यांची लगबग सर्वांच्या नजरेत दिसून आली, ते देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू म्हणून ओळखले जातात व बहुदा देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ भाजप नेत्यांनी त्यांना ह्या कामगिरी वर पाठवले असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे.