सत्तेच्या सारीपाटात आपल्या सारख्या सामान्यांचे स्थान काय?

सत्तेच्या सारीपाटात आपल्या सारख्या सामान्यांचे स्थान काय?

सत्तेच्या सारीपाटात आपल्या सारख्या सामान्यांचे स्थान काय?

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सत्ता बदल किंवा सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षातील आमदारांच्या , नेत्यांच्या व पुढाऱ्यांच्या हालचालींना अतिशय वेग येतो. दिवस रात्र उशीरापर्यंत बैठका सुरू असतात. झटपट निर्णय घेतले जातात. या आधी एकमेकांची अब्रू काढलेली असते. वैर असत मोठं मोठी वक्तव्ये केलेली असतात ते सगळं विसरून फक्त आणि फक्त सत्तेसाठी म्हणजेच पैशासाठी आणि खुर्चीसाठी हे लोक काहीही करायला तयार असतात. भल्या पहाटे राज्यपालांना उठवून शपथ विधी सुद्धा पार पाडतात.
पंचतारांकित हॉटेल्समध्ये बुकिंग म्हणा, प्रायव्हेट विमान , बस वैगरे यांची सोय करतात. तसेच कडक पोलीस बंदोबस्त व दुसऱ्या पक्षातील वरिष्ठांचे उंबरे झिजवले जातात. कोणत्याही पक्षाची युती करतात. काही बंड पुकारतात फक्त नि फक्त सत्ता स्थापनेसाठी तसेच आमदारांच्या पेन्शन चा प्रश्न असो त्यांच्या घरांचा प्रश्न किंवा इतर सोयी सुविधा यासाठी सर्व पक्षीय आमदार एकत्र होतात.
पण माझ्या महाराष्ट्रात आपत्ती आली किंवा एखाद संकट आले की सगळे शेपटी घालून तोंडात विमल घेतल्यासारखे गप्प असतात. शेतकऱ्यांच्या एका मुद्द्यावर निर्णय घेताना यांना अनेक दिवस महिने लागतात. सर्व सामान्यांच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी यांची मत एक होत नाही. पूरपरिस्थिती सर्व सामान्य नागरिक पहिले धावून जातात मग यांच्या गाड्या येतात त्या सुद्धा गाजावाजा करून. राज्यात अनेक प्रश्न आहेत पण त्यावर निर्णय घ्यायला वेळ नाही कोणाला त्यासाठी कोणी कोणाची भेट घेत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करणारे नेते कधी सामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी एक होणार नाहीत. रोजगार , वैद्यकीय सेवा , शिक्षण, मूलभूत सुविधा या सगळ्या काही अंधश्रद्धा आहेत.

सर्वच पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करून मग त्याच चिखलात डुकरासारखं लोळून घेतल आहे.
आम्ही यांचा फक्त तमाशा बघतोय..

आम्हाला आमची ताकद अजून माहिती नाही आहे. खरी सत्ता आपल्या हातात असते. पण आम्हाला स्वतःच्या हक्कांसाठी लढायला नकोय. रस्त्यावर उतरायला नको आहे. आम्ही जे आहे त्यात समाधान मानायला शिकलोय.
त्यामुळे जे चालत आलंय तेच पुढे चालणार कारण आम्ही ते स्वीकारलय.. आमची मेमरी खूप शॉर्ट झाली आहे. मागचं विसरून नवीन फॅड डोक्यात घेऊन आशेवर जगायला लागलोय.. जात , धर्म यांच्या पलीकडचा जो “विकास” आम्हाला नकोय. विकास पाहायला आम्ही परदेशात जाऊ किंवा इतर राज्यात जाऊ. आमच्या डोक्यात हवा भरून आमची मत घेऊन पाच वर्षे आम्हांला चू बनवलं तरी चालेल.
पण आम्ही लढणार नाही आम्ही हे भिकार गलिच्छ राजकारण स्वीकारणार..फक्त नि फक्त तमाशा बघणार..

इतिहास वाचला पण त्यात आपल्या मनगटात किती ताकद होती ती नाही समजून घेतली.

परिवर्तन गरजेचे आहे.. पुढच्या पिढीसाठी….