अपघात करून पळून जाणाऱ्या एस टी चालकाला पनवेल पोलिसांनी केली अटक

अपघात करून पळून जाणाऱ्या एस टी चालकाला पनवेल पोलिसांनी केली अटक

अपघात करून पळून जाणाऱ्या एस टी चालकाला पनवेल पोलिसांनी केली अटक

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव :-साईकृपा हॉटेल शिरढोण येते भांडी घासण्याचा काम करीत असलेला नारायण रामचंद्र पोटले ( भोपली पेण ) माणगांव रायगड याला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी एम एच २० बी एल ३२७६ या क्रमांकाची नंबर प्लेट पडलेली पोलिसांना सापडली या नंबर प्लेटच्या साह्याने तपास करून पनवेल शहर पोलिसांनी एस टी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असं की नारायण रामचंद्र पोटले हा साई कृपा हॉटेल मध्ये भांडी घासण्याचा काम करीत होता तो लघवीला जाऊन येतो असे बोलून गेला व तो परत आला नाही यावेळी त्याला अज्ञात वाहनाने ठोकर देऊन जखमी केले होते यावेळी त्याला ऍम्ब्युलन्स च्या मदतीने दवाखान्यात पाठविण्यात आले यावेळी त्याचा मृत्यू झाला होता पनवेल शहर पोलिसांनी सापडलेल्या नंबर प्लेट च्या आधारे कौसल्यपूर्ण तपास करून पळून गेलेल्या एस टी चालक शरद लहानू मुंटे वय वर्ष ४१ रा नाशिक याच्या विरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केला असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.