थांबला तो संपला…!

100

थांबला तो संपला…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

     “थांबला तो संपला” ही एक प्रचलित म्हण आहे आणि ही म्हण अनेकदा चांगली विचारसरणी असलेल्या व्यक्तीमत्वाकडूनच ऐकायला मिळत असते. एका अर्थाने बघितले तर ह्या म्हणीत सत्यता आहे. म्हणूनच याच समाजातील काही लोक गोग्य वाटेने जात असतात, ते चांगले काही तरी करण्याचा प्रयत्न करतात, वेळ आल्यावर आपल्या चांगल्या कर्माने यशस्वी सुद्धा होतात पण, हेच तर काही . लोकांना अजिबात बघवत नसल्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावत असतात व एक दिवस त्यांचे काम सुध्दा पूर्ण होऊन जात असते, अनेकांची त्या कामासाठी साथ सुद्धा मिळत असते ऐन त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व गालात हसू मात्र वेगळे असते कदाचित असे राजकारण बघून निसर्गाच्या डोळ्यात अश्रू असावेत असे कारनामे व राजकारण कोणापासूनही लपलेले नाही. असे अनेक अनुभव अनेकांना आजपर्यंत कदाचित आले असतील यात काही शंका नाही.

या मधील एक छोटीशी गोष्ट आपल्याला माहीत असेल ती गोष्ट म्हणजेच कासव आणि ससा या दोघांची एकदा दोघांमध्ये पैज लागली होती की, समोर दिसणाऱ्या झाडा पर्यंत आधी कोण पोहोचतो काही क्षणातच ससा उड्या मारत समोर,समोर गेला व जास्त उड्या मारल्यामुळे तो थकून गेला तिथेच त्याला झोप लागली. इकडे बिचारा कासव मात्र हळूहळू चालत,चालत त्या झाडाजवळ पोहचला नंतर काही वेळांनी सशाला जाग आली आणि बघतोय तर..काय कासव त्या झाडाजवळ आधीच पोहचला होता.हे सर्व बघून सशाला योग्य वाटले नाही. ही नुसती एक कथा नसून प्रत्येक माणसाला काहीतरी यातून शिकण्यारखे आहे जर…कासव तिथेच थांबला असता तर कदाचित ही कथा वाचण्यात आली नसती म्हणुन याच समाजात राहणाऱ्या कोणत्याही माणसांनी चालत रहावे व त्या स्वाभिमानी कासवा कडून शिकून घ्यावे.

https://mediavartanews.com/2023/06/11/freedom-fighter-ramprasad-bismil-2/

चालत रहाणाऱ्याच वाटेत काटे,कंकर टाकले जातात,फासे टाकले जातात एवढेच नाही तर.इकडे आड, तिकडे विहीर खोदलेली असते त्यातून जाण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मनाशी एकरूप होऊन जावे,हिंमत हारू नये,स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावे संकटाच्या वेळी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावे किंवा एखादी पुस्तक वाचून पुढचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करावे कारण ,चांगल्या व्यक्तीमत्वाकडून मिळालेला सल्ला व पुस्तकातून मिळालेलं ज्ञान हे कधीच व्यर्थ जात नाही तर…पुढचा मार्ग गाठण्यासाठी सदैव आधार होत असतात व आपले गुरू बनून मार्गदर्शन करत असतात.

      जर आपल्याला थांबायचचं असेल तर एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज किंवा कोणी बिमार असेल तर..माणुसकीच्या नात्याने त्यांची मदत करून माणुसकी धर्म निभावून दाखवावे पण,कोणी चालत असेल तर..त्याच्या वाटेत संकट बनून आपल्यातील माणुसकी विसरू नये, बरेचदा काही लोकांची सवय असते स्वतः कडे तर पूर्ण लक्ष देत नाही, स्वतः मध्ये शोधण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, स्वतः धुतल्या तांदळासारखे नसतात किंवा दुधाने धुतले नसतात जरी अनेक गुण त्यांच्यात असतील तरी एक तरी अवगुण असतोच हे मात्र सत्य आहे या सर्व गोष्टीची जाणीव असताना सुद्धा चालणाऱ्याला थांबवणे खरंच विचार करायला लावणारी बाब आहे. एवढीच जर..दुसऱ्यांना थांबवण्याची आवड असेल तर..जी कोणी व्यक्ती आपली शेवटची घडी मोजत असेल किंवा मरणाच्या दारात उभी असेल तर..तिला एकदाचे थांबवून बघावे. जर…ताकत असेल तर…? पण,असे कधीच होऊ शकत नाही कारण, मृत्यू हे अंतिम सत्य आहे तिला कोणीही थांबवू शकत नाही.

       तसंच सत्याच्या वाटेवर चालण्याऱ्या माणसाचे जीवन सुध्दा तसेच आहे. तो ,सत्याचा स्वीकार करून, एकरूप होऊन जेव्हा चालत असतो तेव्हा मात्र त्याच्या जीवनात संकटाची रांग लागलेली असते ते,संकट कोणते वादळ, वारे,पाऊस नाही तर…याच समाजातील काही बोलते चालते, निंदक,हिंसक, रिकामटेकडे, पैशाचा माज,गर्व,अभिमान, नको त्या लोकांची संगत ज्यांना कोणतेही काम धंदे नसतात असेच लोक वेळातील वेळ काढून एखाद्याच्या वाटेत संकटे बनून त्याला थांबविण्यासाठी कटकारस्थान रचत असतात अशा प्रकारची विचारसरणी असलेल्या लोकांकडून अपेक्षा तरी कोणती ठेवायची. ..? जे,स्वतःच भटकलेले आहेत व वणवण फिरून थकले असतात .

       म्हणुन कोणत्याही माणसांनी हिंमत न हारता व कशालाही न घाबरता, कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता जी योग्य आपण निवडले आहात त्या वाटेवरून चालत रहावे. कधीही चालणे थांबवू नये व कोणाचीही वाट बघू नये कारण या घोर कलियुग आहे या कलियुगात समोर नेणारा कोणीही भेटणार नाही त्या ऐवजी स्वतः च्या स्वार्थासाठी थांबवणारे लाखो भेटतील जीवन तर..आपल्यालाच जगायचं आहे मग कशाप्रकारचे जगायचं आहे ते आपणच ठरवावे “थांबला तो संपला” हे कधीही विसरू नये पण,एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे आपण चालत रहावे पण कोणाचीही वाट अडवू नये किंवा चालणाऱ्याला कधीही थांबवू नये होऊ शकेल तर..सत्याच्या वाटेवर चालण्यासाठी त्यांना मार्ग दाखवावे हीच खरी माणसातील माणुसकी आहे आपल्याला कायम ठेवायची आहे.