एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये योगदिन उत्साहात साजरा

✍️मृणाली जाधव 

माणगांव तालुकां प्रतिनिधी

मो: 7083451685

आरोग्याच्या संपन्नतेला साद देत माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील एस.एस.निकम इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत २१ जूनला विविधांगी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.पूर्व प्राथमिक वर्ग ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी अप्रतिम प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यावेळी शाळेचे मैदान विद्यार्थ्यांच्या संख्येने फुलून गेले होते.मुलांसोबत शिक्षकांनीही प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

https://mediavartanews.com/2023/06/07/international-ocean-day-information/

योगदिनानिमित शाळेतील शारीरिक शिक्षण व R.S.P. शिक्षक श्रीम.शिल्पा चावडा मॅडम व श्री. मनीष देशमुख सर यांनी वेगवेगळी योगासने मुलांकडून करून घेतली. शाळेतील शिक्षिका सौ सावंत मॅडम यांनी मुलांना आरोग्यासाठी योग कसा महत्वाचा आहे याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजीता जाधव आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ . संचीता जाधव या उपस्थित होत्या. अशा प्रकारे हा कार्यक्रम आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here