बिबट्याच्या हल्ल्यात 9 बकऱ्यांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात 9 बकऱ्यांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात 9 बकऱ्यांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात 9 बकऱ्यांचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

सिंदेवाही : 22 जून
सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायत हद्दीतील लोनवाही प्रभाग क्रमांक 2 मधील राजीव गांधी वसाहत परिसरातील महादेव कुंभरे यांच्या मालकीच्या 9 बकर्‍या बिबट्याने ठार केल्या. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. महादेव कुंभरे यांचे जवळपास 10 लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
एक दिवसाआधी याच परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून रवी ढोलणे यांच्या मालकीच्या 5 बकर्‍या बिबट्याने ठार केल्या होत्या. आता पुन्हा याच परिसरात शिरकाव करून कुंभरे यांच्या मालकीच्या 9 बकर्‍या फस्त केल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले. पण, बिबट हुलकावणी देत आहे. बिबट्याला जेरबंद करून नुकसानग्रस्तास आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.