सर्पदंशाने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

सर्पदंशाने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

सर्पदंशाने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

सर्पदंशाने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

सिंदेवाही : 22 जून
सर्पदंशाने किन्ही येथील एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना 20 जूनला मध्यरात्री घडली. दर्पण गणेश गावतुरे असे मृतक मुलीचे नाव आहे. किन्ही येथे गणेश गावतुरे यांच्या कुटूंबातील सर्व मंडळी जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री दर्पणच्या पायाला काहीतरी चावा घेतल्याने ती अचानक रडू लागली. रडताना पाहून आई-वडील व लान भाऊ झोपेतून जागे झाले आणि काय चावला हे पाहत असताना घरात एक विषारी साप दिसून आला. यावरून विषारी सापाने चावा घेतल्याचे कळताच कुटुंबीयांनी तत्काळ सिंदेवाहीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरला नेत असताना दर्पणचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.