सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा येथे प्रधानमंत्री जनमन अभियान शिबिर संपन्न

सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा येथे प्रधानमंत्री जनमन अभियान शिबिर संपन्न

तहसीलदार पानमंद यांची उपस्थिती

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा येथे दिनांक 20 जून 2025 रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अंतर्गत शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये आधार कार्ड नोंदणी, सिकलसेल तपासणी, जॉब कार्ड वितरण, पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड, ऍग्री स्टॅक यासारख्या अनेक योजनांचा लाभ घेण्यात आला. यावेळी संदीप पानमंद तहसीलदार, अमोल शिंदे आदिवासी विकास निरीक्षक, मंगेश तुमराम नायब तहसीलदार , शुभम गुरनुले ग्राम महसूल अधिकारी, रागिनी बोरकर ग्रामपंचायत अधिकारी, अमित रंधये सहाय्यक कृषी अधिकारी, पपीता भोयर सरपंच, वाल्मीक पेंदाम उपसरपंच, सुकरू मानकर महसूल सेवक उपस्थित होते. तालुक्यात विविध ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पानमंद यांनी सांगितले.