3 लग्न झालेल्या नराधम पोलिस बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
नांदेड,दि.22 जुलै:- नांदेड जिल्हातून एक वडिल आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी बातमी समोर. त्यामुळे संपुर्ण जिल्हाच हादळला आहे. सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जन्मदिलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम पोलीस कर्मचा-याने नात्याला आणि खाकी वर्दीला काळीमा फासला आहे. विशेष म्हणजे नराधम आरोपी पोलीस कर्मचाऱ्याची तीन लग्न झाली आहे. त्यानं दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नराधम बापावर बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने नराधम पोलीस कर्मचाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी पोलीस कर्मचारी हा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीनं पहिली पत्नी सोडल्यानंतर दुसरीसोबत संसार थाटला होता. पंरतु तिच्यासोबत देखील न पटल्याने त्याने तिसरा संसार थाटला.
प्राप्त माहितीनुसार, नांदेड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलं आणि मुलींना भेटण्यासाठी नेहमी येत होता. काही दिवसांपूर्वी तो मुलांना भेटण्यासाठी दुसऱ्या पत्नीच्या घरी आला होता. दरम्यान आरोपीने आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेबाबत कुठे वाच्चता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावाला काही दिवस बळी पडल्यानंतर अखेर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस करित आहेत.