अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे रात्री २:०० च्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या तबल्यातील म्हशी रस्त्यावर आणल्या
किमान १००० ते १२०० म्हशी काढण्यात आल्या बाहेर

किमान १००० ते १२०० म्हशी काढण्यात आल्या बाहेर
प्रतिनिधी:- कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेतील रेतीबंदर परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे रात्री २:०० च्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या तबल्यातील म्हशी रस्त्यावर आणल्या असून किमान १००० ते १२०० म्हशी काढण्यात आल्या आहेत. अचानक खाडीतील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कचौरे कोळीवाडा येथील सागरदेवी मंदिर व शेड १० फुट पाण्याखाली गेले आहे. बारावी डॅम्प ची पातळी पूर्ण भरली नसुन अफवांवर विश्वास करू नका अशी माहिती आहे*