नागपुर गुंडानी केला भाच्यावर हल्ल्या, जाब विचारायला गेलेल्या मामाची गुंडानी केली हत्या.

✒युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.21 जुलै:- नागपुर मध्ये दिवसेना दिवस क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज क्राईमच्या अनेक घटना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही गुंडानी एका व्यक्तीच्या भाच्यावर हल्ला केला. हल्ला का केला अशा जाब मामाने त्या गुंडाना विचारला म्हणून त्यांनी मामाची हत्या केली. सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरात ही थरारक घटना घडली. अतुल रामकृष्ण धकाते वय 32 वर्ष असे मृताचे व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी तुषार वर्मा, मनीष शाहूसोबत पैशाच्या व्यवहारातून 18 जुलैला मृतक अतुलच्या भाचा पियुष बरोबर वाद झाला. या वादातुन आरोपीने पीयुषवर हल्ला केला होता, त्यात पियुष जखमी झाला. त्याला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अतुल धकातेने आरोपी तुषार आणि मनीषला मारहाणीचे कारण विचारले. आरोपींनी तुषारसोबतही वाद घालून त्याचा मोबाईल फोडला. त्यानंतर अतुल घराकडे आला तर आरोपी त्यांच्या मित्राकडे गेले. त्यांनी घातक शस्त्रे सोबत घेऊन अतुलच्या घराकडे धाव घेतली. तो बाहेरच उभा होता. आरोपी तुषार, मनीष आणि त्यांच्या साथीदारांनी अतुलवर घातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत अतुलला रुग्णालयात नेले असता मंगळवारी उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यशोधरानगर पोलिसांनी मंगेश रामकृष्ण धकाते वय 35 वर्ष यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी तुषार धनराज वर्मा वय 19 वर्ष, रा. कळमना, सुनील शिवलाल सारंगपुरे वय 20 वर्ष, रा. कळमना, मनीष ऊर्फ डब्ल्यू कमल शाहू वय 19 वर्ष, अंकितकुमार नेमीचंद्र इवनाते वय 19 वर्ष आणि भोलेश्वर ऊर्फ पप्पू श्याम निर्मलकर वय 21 वर्ष, रा. धम्मदीपनगर नागपुर यांना अटक केली.