चिन्मय आनंद योगाभ्यास वर्ग व रोटरी क्लब, यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण सोहळा संपन्न

✒मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
हिंगणघाट,दि.22 जुलै:-चिन्मय आनंद योगाभ्यास वर्ग व रोटरी क्लबचे संयुक्त विद्यमाने दुपारी ठीक 4.०० वाजता पद्मावती नगर, कुणावर कॉलनी, नांदगाव चौक हिंगणघाट येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कॉलनी मध्ये रस्त्याच्या बाजुला व मोकळ्या जागेत कडुलिंब, बहावा व बेल आदीचे झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली.
कडुलिंब व बेल आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या वनस्पती असून त्यामुळे त्वचाविकार, बद्धकोष्टता, रक्त शुद्धीकरण, अमेबियासिस अशा अनेक रोगांवर उपयोगी आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याच व उन्हाळ्यामध्ये सावली देण्याचं काम देखील बहावा व कडुलिंब या वनस्पती करतात असे चिन्मय आनंद योगाभ्यास वर्गाचे संचालक मिलिंद मुळे, मंजुषा मुळे यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी पद्मावती नगर व रोटरी क्लबचे प्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे, जितेंद्र ठाकरे, प्रा.दौलतकर धनराज घोडे, दिनेश धांदे, पत्रकार प्रदीपकुमार नागपूरकर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, वनश्री पुरस्कार प्राप्त दिगंबर खांडरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र केदार,सचिव पुंडलिक बकाने, राजेंद्र गुळकरी, सुरेश चौधरी, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.