चंद्रपूर जिल्‍हयातील वरोरा तालुक्‍यातील पुरस्थितीचा मा.सुधिरभाऊ मुंनगंटिवार यांचा सोबत घेतला आढावा...!

चंद्रपूर जिल्‍हयातील वरोरा तालुक्‍यातील पुरस्थितीचा मा.सुधिरभाऊ मुंनगंटिवार यांचा सोबत घेतला आढावा…!

चंद्रपूर जिल्‍हयातील वरोरा तालुक्‍यातील पुरस्थितीचा मा.सुधिरभाऊ मुंनगंटिवार यांचा सोबत घेतला आढावा...!

✍मनोज एल. खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016

वरोरा :- गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्‍ट्रात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तशीच स्थिती चंद्रपूर जिल्‍हयात सुध्‍दा निर्माण झाली आहे. जिल्‍हयातील जवळपास सर्व तालुक्‍यांमध्‍ये पुरस्थिती गंभीर आहे. आशा परिस्थितीत जिल्ह्याचे माजी कँबिनेट मंत्री,माजी पालक मंत्री आ.श्री.सुधिरभाऊ मूनगंटिवार काल मुंबईहून नागपूरला आले व वरोरा तालुक्‍यातील अनेक गावांना प्रत्‍यक्ष भेटी दिल्‍या.

वरोरा शहरातील साई मंगल कार्यालयात वास्‍तव्‍याला असलेल्‍या नागरिकांच्‍या भेटी याप्रसंगी घेतल्‍या व त्‍यांच्‍या समस्‍या समजून घेतल्‍या व अधिकारी व पदाधिका-यांना त्‍यावर त्‍वरीत उपाययोजना करण्‍यास सांगीतले. याप्रसंगी भाऊ नि मला व माझ्या चमुला यासर्व नागरिकांच्‍या समस्‍यांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्‍यांना योग्‍य ती मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानंतर कुचना गावाला भेट दिली असता तेथील प्राथमिक शाळेत पळसगांवचे 121 नागरिक व थोरानाचे 47 नागरिक वास्‍तव्‍यास असल्‍याचे लक्षात आले. तिथे प्राथमिकरित्‍या जेवण न मिळण्‍याची समस्‍या असल्‍याचे लक्षात आले. त्‍यावर या नागरिकांना धान्‍य देण्‍याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसलिदार यांना दिले. पळसगांवला वेकोलिच्‍या ओबीमुळे गावात पाणी घुसले असा आरोप तेथील नागरिकांनी केला. वेकोलिचे अधिकारी अशा पुरस्थितीत नागरिकांना कुठलीही मदत करीत नाही असे सुध्‍दा नागरिकांनी सांगीतले. पिण्‍याच्‍या पाण्‍याची स्थिती सुध्‍दा खराब असल्‍याचे नागरिकांनी सांगीतले. त्‍यावर मा.सुधीरभाऊ यांनी ताबडतोब वेकोलिच्‍या मुख्‍य महाप्रबंधक यांच्‍याशी बोलून यावर उपाययोजना करण्‍यास सांगीतले.
त्‍यानंतर पाटाळा या गावाला भेट दिली. हे गांव पूर्णतः पुराच्‍या तडाख्‍यात सापडले आहे. या गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची संपूर्ण व्‍यवस्‍था पूर्णपणे खराब झाली आहे. त्‍याकरिता मजिप्राला याची माहिती देवून नविन अंदाजपत्रक तयार करावयास सांगावे असे पदाधिका-यांना सांगीतले. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरव गावातील लोकांची जेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देश पदाधिका-यांना दिले.

या दौ-यात मा.सुधिरभाऊ मूनगंटिवार सोबत भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, वरोराचे माजी नगराध्‍यक्ष अहेतेशाम अली, माजी जि.प. सदस्‍य नरेंद्र जिवतोडे, बाबाभाऊ भागडे,करन देवतळे,अफजलभाई,अमित गुंडावार,सुनिताताई काकडे,सायरा शेख,विनोद लोहकरे,राजेश साकुरे,अमित चवले,पत्रकार-श्याम ठेंगळी सर,निलेश देवतळे,गोपाल माकडे, उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. आयुष नोपानी, व त्‍या त्‍या गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here