चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पिंट्टी गुडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बालविवाह रोखण्यास हृदयसंस्थेला यश
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की हृदय संस्थेचे क्षत्रिय अधिकारी श्री शशिकांत मोकाशे यांना गोपनीय सुत्वाद्वारे प्राप्त माहिती झाली की पिट्टीगुडा पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील 14 वर्षे बालिकेचा साखरपुडा करण्यात आला व तिचं लगेच चार दिवसांनी लग्न करण्याचे ठरले होते. हृदयसंस्थेच्या वतीने असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन प्रकल्प , जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन या प्रकल्पाच्या वतीने गत तीन वर्षापासून जिवती कोरपणा व चंद्रपूर जिल्ह्यातील बालविवाहासाठी हॉटस्पॉट असणाऱ्या क्षेत्रात सातत्याने विवाह प्रतिबंधाचे काम सुरू आहे त्या अनुषंगाने माहिती मिळताच गावची अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामपंचायत सचिव व संस्थेचे क्षत्रिय अधिकारी श्री शशिकांत मोकाशी यांनी बालिकेचे घर गाठले, बालिकेच्या कुटुंबाला बालविवाह बद्दल बालविवाह होणार्या बालिकेच्या नुकसाना बद्दल, तसेच बालविवाह शासनाने गठीत केलेली शिक्षा यावर गावकऱ्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या समक्ष बालिकेच्या आई वडील यांना माहिती देण्यात आली व ग्रामपंचायतच्या माध्यमातून लेखी सूचना पत्र देऊन सदर बालिकेला बाल कल्याण समिती चंद्रपूर यांचे समक्ष हजर करण्याकरिता सुचविण्यात आले. सदर बाबतीची व घटनेची माहिती नजीकच्या पिट्टीगुडा पोलीस स्टेशन येथे डायरी नोंद करून या बालविवाहाच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला . सदरच्या बालविवाहाच्या प्रतिबंध कार्यक्रमाला माननीय जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर पोलीस अधिकारी पिट्टीगुडा पोलीस स्टेशन, बलिका ज्या शाळेत शिकत असली त्यातील मुख्याध्यापक ग्रामपंचायत सचिव मरकागोंदी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.