शासन आपल्या दारी या अंतर्गत ‘स्वच्छतादूत कल्याणकारी दिन’ मोठया उत्साहात साजरा

शासन आपल्या दारी या अंतर्गत ‘स्वच्छतादूत कल्याणकारी दिन’ मोठया उत्साहात साजरा

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे कि राज्य सफाई कामगार आयोग, नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी या अंतर्गत ‘स्वच्छतादूत कल्याणकारी दिन’ मंगळवारी (ता. २२) पाटीदार भवनात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार १६९ वारसदारांना वारसा नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर होते. यावेळी आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. संदीप जोशी, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, श्री. प्रसाद कुलकर्णी, उपायुक्त श्री. राजेश भगत, सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुकेशनी तेलगोटे, क्रीडा अधिकारी श्री. पियूष अंबुलकर, माजी नगरसेवक श्री. मुन्ना यादव, माजी नगरसेवक श्री. संजय बंगाले, माजी नगरसेवक श्री. रमेश सिंगारे उपस्थित होते.