आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित रेड रन स्पर्धा साजरी
स्पर्धेमध्ये मुलांमध्ये स्वागत पाटील व मुलींमध्ये नेहा म्हात्रे प्रथम
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या आदेशानुसार व डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध या नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व लायन्स क्लब, श्रीबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जुलै २०२५ रोजी, सकाळी ११.०० वाजता रेड रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर रेड रन स्पर्धेचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. निशिकांत पाटील यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, शासकीय वैदयकिय महाविद्यालय अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. अनंत बिडकर, सहयोगी प्राध्यापक सर्जरी विभाग डॉ. रवी वरट, प्राध्यापक बालरोग विभाग डॉ. बंडेवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रवीण कंदाडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, मेरा युवा भारत, अलिबाग- रायगड जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, लायन्स क्लब, श्रीबाग माजी अध्यक्ष श्री. वनगे, लायन्स क्लब माजी अध्यक्ष ऍड. कला पाटील, संस्थापक, लायन्स क्लब, श्रीबागवअँड. निहा अनिस राऊत, खजिनदार तानाजी भोसले, तपस्विनी गोंधळी, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू,स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग, डॉ. भैरवी मालवणकर, वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची व्हाट्सअँप व स्पर्धेच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी करून एचआयव्ही/एड्सच्या अनुषंगाने युवा वर्ग हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यांच्यामध्ये एचआयव्ही/एड्सच्या अनुषंगाने जनजागृती व्हावी या मुख्य उद्देशाने सदर रेड रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धा हि अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून सुरुवात करून ती काँग्रेस भुवन समोरून हिराकोट तलावाला फेरी मारून पुन्हा त्याच मार्गाने समुद्र किनाऱ्यावर सांगता करण्यात आली. त्यामधून मुलांमध्ये प्रथम क्रमांक स्वागत समीर पाटील, पी.एन.पी. कॉलेज वेश्वी, द्वितीय क्रमांक अमर भागोजी धुमाने, केईएस डॉ. सी.डी.देशमुख कॉलेज रोहा व तृतीय क्रमांक अशोक बाळाराम वारगुडे, भाऊसाहेब नेने कॉलेज, पेण यांनी पटकाविला. तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक नेहा हेमंत म्हात्रे, जे.एस.एम. कॉलेज, द्वितीय क्रमांक अदिती बबन मेंगाळ, भाऊसाहेब नेने कॉलेज, पेण व तृतीय क्रमांक प्रणाली शशिकांत तळेगावकर, पी.एन.पी. कॉलेज वेश्वी हिने पटकाविला. यावेळी विजेत्या मुले व मुली याना प्रथम क्रमांकास रु. २०००/-, द्वितीय क्रमांकास रु. १५००/-, तृतीय क्रमांकास रु. १०००/- , सन्मानचिन्ह, पदक व प्रशस्ती प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. निशिकांत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, शासकीय वैदयकिय महाविद्यालय अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. अनंत बिडकर यांच्या हस्ते तात्काळ देऊन गौरविण्यात आले. तसेच भूमी म्हात्रे व पर्णवी मयेकर या वयाने लहान असूनही त्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस संस्थापक, लायन्स क्लब, श्रीबाग अँड.निहा अनिस राऊत यांच्याकडून देण्यात आले. तर सहभागी विध्यार्थाना प्रमाणप्रत देण्यात आले.
सदरची रेड रन स्पर्धा ही सुरळीत पार पाडण्याकरिता जिल्हा सहाय्यक लेखा अधिकारी रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड ई सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर डापकु, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनवणे, सुजाता तुळपुळे, समुपदेशक, कल्पना गाडे, अर्चना जाधव, डीएसआरसी समुपदेशक अश्विनी कदम, मोबाईल आयसीटीसी व्हॅन समुपदेशक रामेश्वर मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, अतिश नाईक, रुपेश पाटील, महेश घाडगे, एआरटी समुपदेशक अक्षय बेरड यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग ऑफिसर, परीसेवीका, शिकाऊ नर्सेस, एन.व्ही.एच.सी.पी. समन्वयक सुनील चव्हाण तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयांमधील व ओपीडीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व आभार प्रदर्शन संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांनी केले.